व्हीएसआरएस मराठी न्युज –आज JW मेरियट येथे पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी चूल व देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी अयशस्वी असल्याने स्मृती ईराणी यांच्या मार्फत त्यांना बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या महिलाला पोलिस यांनी अटक केली.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या धोरणानुसार आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहू. यासाठी पोलिसांनी आम्हाला शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत .
Discussion about this post