व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरकाल मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली.
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करुन, आपण राज्यसभेची जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही उपस्थिती होती.
२९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
Discussion about this post