व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.१३ मा.सर्वोच्च न्यायालयाने SPL क्र.१९७५६/२०२१ मधील दि.४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरन राज्य निवडणूक आयोगाच्या दि.१०/०३/२०२२ रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून
निवडणूकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यास अनुसरून प्रारूप रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग ,महाराष्ट्र यांच्या पत्रा द्वारे आळंदी नगरपरिषदेने जाहीर केला होता.
७ जून ला अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली.आज १३ जून रोजी आळंदी नगरपरिषद सर्वात्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आळंदी नगरपरिषदे मध्ये उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी पार पाडला.प्रथम अनुसूचित जाती महिला व अनुसूचित पुरुष या वर्गासाठी
प्रभाग क्र.२अ व प्रभाग क्र.१०अ साठी चिट्टी स्वरूपात निवड करण्यात आली.निवडणूक आरक्षण कायदा,प्रक्रिया व संबंधित चिट्टी प्रक्रिया
माहिती नसलेल्या लहान मुलाची यशवर्धन घुंडरे इ.६ वी वय वर्षे १२ याची
चिट्टी प्रक्रिये साठी निवड केली.
१०अ व २अ अनुसूचित जाती आरक्षण महिला साठी बंद अश्या २ चिट्टी डब्यात टाकून त्यातून एक चिट्टी निवड करण्यासाठी यशवर्धन ला सांगण्यात आले.त्यातून त्याने एक बंद चिट्टी
निवडली ती उपजिल्हाधिकारी यांनी उघडली व वाचली.
उघडलेल्या चिट्टीद्वारे प्रथम १० अ ही
अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली तर उरलेली दुसरी प्रभाग क्र.२ अ साठी अनुसूचित जाती आरक्षण सोडत जाहीर केले.
प्रभाग क्र. १ :-अ) सर्वसाधरण महिला ब)सर्वसाधारण
प्रभाग क्र.२:- अ) अनुसूचित जाती ब) सर्व साधारण महिला
प्रभाग क्र.३:-अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.४:-अ)सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.५:- अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.६:- अ) सर्व साधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.७:-अ)सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.८:-अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.९:- अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.१०:- अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण महिला क)सर्वसाधारण
अशी आळंदी नगरपरिषद आरक्षण सोडत -२०२२ जाहीर झाली.
यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे,मुख्याधिकारी अंकुश जाधव,कार्यकालीन अधीक्षक किशोर तरकासे व आळंदी नगरपरिषद कर्मचारी व माजी पदाधिकारी इ .उपस्थित होते.
एकूण सदस्य संख्या २१ आहे. प्रभाग
१ते ९ मध्ये अ ब एकूण १८ सदस्य तर १० मध्ये अ ब क ३ सदस्य आहेत.
महिला आरक्षण संख्या ५०% असल्याने साडेदहा टक्के महिला आरक्षण पडले.
Discussion about this post