व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.१६ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाची विविध कामे होऊन सज्ज झालेला दिसून येत आहे. पांडुरंग वरखडे यांची सोन्या–माऊली ह्या बैलजोडीने आज आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ ओढण्याचा सराव केला.२१ जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.
दोन वर्ष वारी न झाल्याने ह्या रथाची क्लिनिंग इ.डागडुजी कामे चालू होती. ह्या रथाच्या विविध कामांमुळे हा रथ उजळून निघाला असून झालेल्या या कामा मुळे रथाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.रथाची राहिलेली काही दुरुस्तीची कामे व सराव करते वेळी रथाची पाहणी करून किरकोळ दुरुस्ती साठी कारागीर ही आळंदी मधील संस्थांनच्या भक्त निवसा मध्ये कार्यरत आहेत.
Discussion about this post