व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी शहराच्या विविध भागातील 237 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली.
आजपर्यंत शहरातील 4 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 63 49 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1358 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 290 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
राज्यात आज 3098 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे.
राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,21, 140 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.89 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 20,820 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6409 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यात 4037 सक्रिय रुग्ण आहेत.
Discussion about this post