व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -‘ईद-अल-अधा’_ या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या १० व्या दिवशी _‘ईद-अल-अधा’_ चा दिवस येतो.
या दरम्यान मुस्लीम बांधव कोणताही उपवास करत नाही. या महिन्यात ‘हज्ज यात्रे’चे आयोजन मोठ्या प्रमाणवर केले जाते.
त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अधा’ होय. ही ईद अडीच दिवस साजरी केली जाते. या दिवशी मुस्लीम बांधव ‘बकरी किंवा बोकड’ अल्लाहला समर्पित करतात. यातून मिळणाऱ्या मटणाचे तीन भाग केले जातात. पहिला भाग हा कुटुंबियांसाठी असतो, दुसरा भाग नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये वाटला जातो. शेवटचा, तिसरा भाग अन्नासाठी भुकेलेल्या गरिबांना दिला जातो.
पवित्र ‘कुराण’ सर्वांनाच समर्पण करण्याची सक्ती करत नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच बकरी किंवा बोकडाचा बळी द्यावा आणि मिळणारे मटण गरिबांसोबत वाटून खावे असे पवित्र ‘कुरआन’ मध्ये सांगितले आहे.
मुस्लिम बांधवांचे वर्षातील 2 महत्त्वाचे सण म्हणजे एक रमजान ईद आणि बकरी ईद. मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात.
रमजान ईद नंतरचा मोठा सण म्हणून हा दिवस ओळखला जातो. यावेळी मुस्लीम बांधव एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करतात तसेच एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छाही देतात. यादिवशी घरोघरी शेवया, मिठाई आणि पक्वान्न बनवली जातात आणि कुटुंबातील मंडळी एकत्र मिळून याचा आस्वाद घेतात.
ईद उल जुहा’ चा अर्थ म्हणजे ‘बलिदानाची ईद’. इस्लाम धर्मावर ज्यांची आस्था आहे त्यांच्यासाठी हे प्रमुख पर्व आहे. हे पर्व रमजानच्या नंतर जवळपास 70 दिवसांनी साजरे केले जाते. मुस्लिम मान्यतानुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईलला याच दिवशी अल्लाहच्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाहने हजरत इस्माइलला जीवन दान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पर्व साजरा केले जाते.
ईद उल जुहाचे पर्व हिजरीच्या अंतिम महिन्यात जुल हिज्जमध्ये साजरे केले जाते. या दिवशी देशभरातील मुसलमान मक्का (साउदी अरब) मध्ये एकत्र येऊन हज साजरी करतात. ईद उल जुहाचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. या दिवशी जनावराचा बळी देणे एक प्रकारचे प्रतिकात्मक बलिदान आहे, अशी प्रथा समजली जाते.
बकरी ईद’ किंवा ‘त्यागाचा सण’ असे संबोधले जाते. यामागे देखील एक कथा सांगितली जाते.
अल्लाहने ‘हजरत ईब्राहीम’कडे त्याच्या मुलाचा बळी मागितला. तेव्हा क्षणाचाही विचार नं करता आपल्या मुलाची हत्या करण्यासाठी ईब्राहीम पुढे सरसावताच अल्लाहने ‘इसहाक’च्या (ईब्राहीमचा मुलगा) जागी ‘बकरी’ प्रकट केली आणि ईब्राहीमला सांगितले की“तुझी माझ्यावरची निष्ठा पडताळण्यासाठी मी तुझी कसोटी घेतली आणि त्यात तू यशस्वी देखील झालास.”
Discussion about this post