व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या विविध योजना जाहीर झाल्या असून , नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे माहिती देत आहे .
🔸 इयत्ता १०वी शालान्त परीक्षेत ८० ते ९० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्याना रुपये १० हजा
🔸 इयत्ता १० वी शालान्त परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्याला रुपये १५ हजार
🔸 इयत्ता १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना रुपये १५ हजार
🔸 एखाद्या व्यावसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या विधवा महिलेस व्यावसायासाठी रुपये २५ हजार देण्यात येतील .
🔸 एखाद्या विधवा महिलेने कोणतेही व्यावसायाचे प्रशिक्षण घेतले नसेल तरी १५ हजार रुपये अनुदान मिळेल .
🔸पहिल्या मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या
दांपत्याला तिच्या मुलींच्या नावे २५ हजार रुपये मुदत ठेव ठेवली जाईल .
🔸सर्व साधारण गटातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या मुलींना सायकल घेण्यासाठी रुपये ७ हजार अनुदान मिळेल
मागासवर्गीय कल्याणकारी योजना
🔸इयत्ता ५ वी ते १० वी तिल विद्यार्थ्याना शिष्यवृत्ति म्हणून रुपये ४ हजार देण्यात येईल
🔸 इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थयाना शिष्यवृत्ति रुपये ६ हजार देण्यात येईल .
🔸 सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करून
रुपये २५ हजार मानपत्र ,, व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येईल
🔸 यासह दिव्यांग व्यक्ति , दिव्यांगणा संभाळ करणाऱ्या संस्था किंवा पालक यांच्या साठी विविध योजना जाहिर झाल्या आहेत .
🔸त्याच बरोबर विधवा महिलांच्या मुलींना संसार उपयोगी वस्तु घेण्यासाठी अनुदान
🔸महिला बचत गट अनुदान
🔸सर्वसाधरण व मागासवर्गीय
🔸मुलींना उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेण्याकरिता अनुदान
आशा विविध योजना महापालिकेने जाहिर केल्या आहेत .
यासाठी पात्र विद्यार्थी हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे.
Discussion about this post