व्हीएसआरएस मराठी न्युज — पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत संगीत अकादमीतर्फे (बुधवारी) देशभक्तीपर गीतांचा स्वरामृत-2022 हा सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत शहरातील नागरिक, संगीत प्रेमी व शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थी, शिष्य यांच्यामध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व आवड निर्माण होण्यासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका योगिता गोडबोले, प्रख्यात गायक राजेश दातार व त्यांचा वाद्यवृंद समूह यांचे देशभक्तीपर गायन व वादन करणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी केले आहे.
Discussion about this post