व्हीएसआरएस मराठी न्युज –जळगाव : धरणगाव मध्ये काल शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसैनिकांनी आज दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले आहे. गद्दारांचा महापुरुषांचा पुतळ्यास स्पर्श झाल्याने शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे काल प्रथमच जळगावत आले होते. त्यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते. परंतु, याच पुतळ्यांचे शुद्धीकरण आज शिवसैनिकांनी केले आहे.
गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून धरणगावमध्ये शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून पुतळ्यांचे शुद्धीकरण केले, अशी माहिती शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांनी काल जळगावमध्ये आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांचे पूजन करून अभिवादन केले होते. मात्र, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकार नसल्याचं सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही स्मारकांचे दुग्धाभिशेकाने शुध्दीकरण करून निषेध व्यक्त केला आहे.
Discussion about this post