व्हीएसआरएस मराठी न्युज -विश्व श्रीराम सेना अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माता की चौकी भजन व पूजा आयोजित केली आहे.
श्रीदुर्गासप्तसती पठण सकाळी ९ ते माता की चौकी भजन ते सायंकाळी ६.पर्यत
स्थळ- अंबिका भवन, नायर कॉलनी, सानेचौक, मोरेवस्ती, चिखली, पुणे-
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. . नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यंदा ५ ऑक्टोबरला विजय दशमी साजरी होणार आहे.
नवरात्रीच्या आठव्या दिवसाला अष्टमी तिथी Mahashtami म्हणतात. या दिवशी माँ दुर्गेचे आठवे रूप महागौरीची पूजा करण्याचा नियम आहे. मात्र, तिथी वाढल्याने किंवा घटल्याने अष्टमी तिथी पुढे मागे सरकते. यावेळी महाष्टमीचा उपवास 3 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात येणार आहे. नवरात्रीतील नवमी व्रत 4 ऑक्टोबर 2022 रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे. धार्मिक कथांनुसार, देवी दुर्गेने राक्षसांचा राजा महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. त्यामुळे हा सण नऊ दिवस साजरा केला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला माँ दुर्गेचा वाईटावर विजय झाला. म्हणूनच याला महानवमी म्हणतात.
या नवरात्र उत्सवाबरोबरच ४ ऑक्टोबर ५ ऑक्टोबर रोजी माता चौकी पूजन केले जाणार आहे. तरी इच्छुक भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता ,व प्रमोद गुप्ता +918080806500 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
Discussion about this post