व्हीएसआरएस मराठी न्युज मोशी-उत्तर भारतीय बांधवांच्या चार दिवसीय छठ पूजा उत्सवास २८ पासून प्रारंभ झाले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था व इतर आवश्यक बाबी पुरवाव्यात, अशी मागणी विश्व श्रीराम सेना अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती.
त्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोशी इद्रायणी नदीवरील घाटास प्रत्यक्ष भेट देत कामांचा आढावा घेतला. त्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अधिकारी, डॉ गुप्ता, प्रमोद गुप्ता ,शामबाबू गुप्ता ,रोहीत गुप्ता ,अक्रम शेख , राहुल गुप्ता आदी उपस्थित होते.
विश्व श्रीराम सेना अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता म्हणाले, नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथून आलेले नागरीक पिंपरी चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. मोशी इंद्रायणी नदीच्या घाटावर उत्सव साजरा केला जातो.
रविवारी (दि. ३०) आणि सोमवारी (दि. ३१) रोजी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोशी इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ लालबाबु गुप्ता यांनी केले आहे.
Discussion about this post