व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दि. ०१ नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील प्रशासकीय इमारतीमधील पत्रकार कक्षात ” दिवाळी फराळ ” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाची आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पत्रकार कक्षात बैठक पार पडली. बैठकीत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या सदस्यासाठी ” दिवाळी फराळ ” कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, सरचिटणीस बाबू कांबळे तसेच संघाचे सदस्य गणेश शिंदे, संतोष जराड, कलिंदर शेख, अमोल डंबाळे आदी उपस्थित होते.
Discussion about this post