व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने “वर्ल्ड टॉयलेट-डे’ निमित्त चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यक्रमात स्वच्छ सुरक्षित शौचालय थर्टी डेज या मोहिमेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.19) पार पडले,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहशहर अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात, राजेश आगळे, सिताराम बहुरे, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
माय टॉयलेटचे आणि टॉयलेट वरील भिंती चित्राचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वर्ल्ड टॉयलेट-डे निमित्त लोकमान्य हॉस्पिटल पासून रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहपर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेच्या वतीने काही बचत गटांना प्रायोगिक तत्वावर सामुदायिक शौचालय स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामाचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या उत्तम थोरात, विनोद वानखेडे, स्वप्निल भंडारे, निलेश आंभोरे, नितीन वाघमारे, प्रशांत जगताप, दीपक शेंडगे या सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Discussion about this post