व्हीएसआरएस मराठी न्युज भोसरी-भाजपा ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा तर्फे स्वामी दयानंद छात्रालय आश्रम चिखलीमध्ये आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत अन्नदान सेवा संपन्न.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्यातर्फे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत आज दुसऱ्या दिवसांतर्गत श्री.स्वामी दयानंद छात्रालय, अनाथाश्रम चिखली या ठिकाणी विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष मा. ऋषिकेशभाऊ रासकर,भाजपा ओबीसी युवक मोर्चा शहराध्यक्ष राजेशभाऊ डोंगरे,ओबीसी महिला मोर्चा शहराध्यक्ष जयश्रीताई देशमाने, प्रा.नितीन साळी (सरचिटणीस भाजप ओबीसी युवक मोर्चा) विमलताई काळभोर (प्रभाग अध्यक्ष यमुनानगर निगडी) जयश्रीताई मकवाना (निगडी-चिखली मंडळ उपाध्यक्ष) लताताई हिंदळेकर (उपाध्यक्ष भाजप ओबीसी महिला मोर्चा), कुमार रासकर, सामाजिक कार्यकर्ते मुकेश व्हणवटे, युवा नेते आदित्य लांडगे, राजेश चौहान, श्रीकांत रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post