व्हीएसआरएस मराठी न्युज –केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिलेल्या सन 2021-22 च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मगरीचा वृध्दत्वामुळे तर मोरांचा उष्णतेच्या परिणामाने हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्राणिसंग्रहालय पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आहे.
अंतर्गत नूतणीकरणाचे काम सुरू असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, प्राणिसंग्रहालय बंद असल्यामुळे मोरांची व्यवस्थितरित्या काळजी घेतली गेली की नाही, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने कोणती उपाययोजना केली होती का, केली होती तर 7 मोरांचा एकाच कारणाने मृत्यू कसा झाला, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. दरम्यान, प्राणिसंग्रहालय प्रशासनाने शवविच्छेदनानंतर मगरीचे दफन केले आहे. तर 7 मोरांचा अग्नी देऊन अंत्यसंस्कार केल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत या प्राणिसंग्रहालयाकडे 90 विविध प्रजातींचे पक्षी आणि 102 सरपटणारे प्राणी आहेत. असे एकूण मिळून 192 प्राणी या प्राणिसंग्रहालयात आहेत. 8 प्राणी दगावल्यामुळे संख्या कमी झाली असून पूर्वी येथे एकूण 200 प्राणी, पक्षी होते.
Discussion about this post