नई दिल्ली | (व्हीएसआरएस न्यूज) | मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आता नव्या दरानुसार दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ११०३ रुपयांवर पोहोचली. तर, मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. देशातील सर्वसामान्यांसाठी हा महागाईचा मोठा झटका मानला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झालीय. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
जाणून घ्या महानगरांमधील दर (घरगुती सिलेंडर्स)
या प्रमाणे (जुने दर)/(नवीन दर)
दिल्ली : १०५३ रुपये / ११०३ रुपये.
मुंबई : १०५२.५० रुपये / ११०२.५० रुपये.
कोलकाता : १०७९ रुपये / ११२९ रुपये.
चेन्नई : १०६८.५० रुपये / ११८०.५० रुपये.
गत ८ महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या असून यापूर्वी १ जुलै २०२२ ला घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यावेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली.
Discussion about this post