मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात देखभाल आणि दुरूस्तीच्या कामांसाठी मेनलाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीमा मार्ग (सकाळी १०.५५ – दुपारी ०३.५५)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत धावणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.
सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
Discussion about this post