व्हीएसआरएस मराठी न्युज –गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, हा शिधा गुढीपाडवा झाल्यानंतरच येणार आहे. धान्य दुकानांमध्ये धान्य पोहचण्यास आठवडाभराचा कालावधी लागणार आहे.
राज्य सरकारने गुढीपाडवा या मराठी नववर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांसाठी 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचे जाहीर केले होते. ई-पॉस प्रणालीद्वारे देण्यात येणार्या या ‘आनंदाचा शिधा’मध्ये रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि 1 लिटर पामतेल दिले जाणार आहे.
आनंदाचा शिधा’ हा गुढीपाडवा (22 मार्च) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) या कालावधीत वितरित करायचा आहे. अद्याप त्यासाठी धान्य आले नसले तरी पुढच्या आठवड्यात धान्य आल्यानंतर लाभार्थ्यांना त्याचे वाटप सुरु होईल.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी.
Discussion about this post