व्हीएसआरएस मराठी न्युज -केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. आता त्यांच्या जामीन अर्जावर २१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या 5 दिवसांच्या कोठडीत आहेत, जे उद्या म्हणजेच 22 मार्च रोजी संपत आहे. त्यांच्या अटकेनंतर ईडीने त्यांना 17 मार्च रोजी राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली.
दिल्लीच्या एका न्यायालयाने हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. ईडीने त्यांना 6 मार्च 2023 रोजी अटक केली. अरुण रामचंद्र पिल्लई आता ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत.
मात्र, त्यांना जामीन मिळू शकला नाही आणि न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. दरम्यान, आता त्यांच्या जामिनावर 21 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
Discussion about this post