व्हीएसआरएस मराठी न्युज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सेक्टर क्र.२३ जलशुद्धीकरण केंद्र अप्पू घर प्रवेशद्वाराजवळ, निगडी येथे इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मोहीम आयोजित करण्यात आला असून आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सेवा व सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार खोराटे, श्री. उल्हास जगताप, शहर अभियंता श्री. मकरंद निकम, तसेच विशेष अतिथी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री. निळकंठ पोमण, उप आयुक्त श्री. मनोज लोणकर, सह शहर अभियंता श्री. ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता श्री. बापुसाहेब गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र वादेवार, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त श्री. यशवंत डांगे, श्री. अण्णा बोदडे, श्री. विजयकुमार थोरात, क्षेत्रीय अधिकारी श्रीम. सुचिता पानसरे, विशेष अधिकारी श्री. किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी श्री. प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन-अर्बनला नऊ वर्षे आणि स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 ची दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी, विविध शहरांमध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिरांच्या रूपाने 17 सप्टेंबर 2023 पासून देशात एकल खिडकी कल्याण शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांचा उद्देश स्वच्छता कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे आणि त्यांचे कल्याण आणि जीवनमान सुधारणे हा आहे. घनकचरा व्यवस्थापन (SWM) आणि वापरलेले पाणी व्यवस्थापन (UWM) मधील सर्व स्वच्छता कामगारांना लक्ष्य करणे हे शिबिराचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत प्रमुख उपक्रमांमध्ये जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, योग शिबिरे आणि विविध मंत्रालयांच्या सहकार्याने केंद्र आणि राज्य योजनांचे विविध कल्याणकारी लाभ पोहोचवणे यावर भर दिला जाईल.
Discussion about this post