Mumbai News : मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी २१ मार्च रोजी महाराष्ट्रातील काही लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर केली.
काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली असून महाराष्ट्रातील सुमारे १८ जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
पुणे : रविंद्र धंगेकर
सोलापूर : प्रणिती शिंदे
अमरावती : बळवंत वानखेडे
कोल्हापूर : शाहू छत्रपती
नंदूरबार : गोपाळ पाडवी
नांदेड : वसंतराव चव्हाण
लातूर : शिवाजीराव काळगे
Discussion about this post