Pimpri News : पिंपरी चिंचवड महापालिकेतील सहायक आयुक्त अजय चारठणकर आणि मिनीनाथ दंडवते यांची बदली झाली आहे.तसे आदेश नगरविकास खात्याचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी २६ मार्च रोजी जारी केले.
चारठणकर यांना सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त सोलापूर या पदावर तर, दंडवते यांना परभणी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदलण्यात आले आहे. त्यांच्या जागी पंकज पाटील, तानाजी नरळे हे दोन आधिकारी येणार आहेत.
हे बदली आदेश तात्काळ प्रभावाने अमलात येणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर रुजू व्हावे व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुध्द शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच, त्यांचेविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील तरतूदींनुसार शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे.
Discussion about this post