व्हीएसआरएस न्युज आळंदी-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वरूप दर्शन मंचकडून आळंदी येथे इंद्रायणी नदीवर घाट आणि यज्ञकुंड बांधण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी फिर्यादी यांनी 40 हजार रुपये किमतीचे घडीव दगड आणले होते. ते दगड आरोपींनी टेम्पोत (एम एच 12 / एफ डी 5789) भरून चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
राहुल रंगनाथ रंधवे (वय 61, रा. आळंदी देवाची) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश तेलंग, डी डी भोसले आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी येथील इंद्रायणी घाटावर घाट आणि यंज्ञकुंडाच्या कामासाठी. आणलेले 40 हजारांचे घडीव दगड चार जणांनी मिळून टेम्पोत भरून चोरून नेले. ही घटना 30 डिसेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊ या कालावधीत घडली.