व्हीएसआरएस न्युज बुलडाणा : राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव म्हणून पुनःश्च नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना पंजाब राज्याचे प्रभारी सचिव म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केल्याचे पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. सन २०२२ मध्ये पंजाब मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण समजल्या जात आहे.
Discussion about this post