व्हीएसआरएस न्युज गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं होतं.
मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं.
मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं. परंतु, किरण गोसावीनं पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशमध्येही गुंगारा दिला होता. पुणे पोलिसांच्या दोन पथकांकडून किरण गोसावीचा उत्तर प्रदेशमध्ये तपास सुरु होता. गोसावीचं शेवटचं लोकेशन यूपीतील फत्तेपूरमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. तसेच, किरण गोसावी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून तो सातत्याने त्याचं लोकेशन बदलत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती.
किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात, चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न
दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
Discussion about this post