व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप युवा नेते पांडा भाऊ साने यांनी आपल्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन कोविड योध्यांना समर्पित केलं आहे त्यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे.
कोरोना महामारी मुळे आपले जनजीवन विस्कळीत झाले आहे भलीमोठी जवळची माणसं हिरावून नेली आहेत तर कोणी जायबंदी झाली कुठेतरी जनजीवन सुरळीत होत असतानाच आता तिसरी लाट येऊ पाहते आहे अशा कठीण काळात मी माझा वाढदिवस कसा साजरा करू ?
कोरोना च्या काळात एक हात मदतीचा मीही दिला परंतु माझ्यापेक्षा कोविड योध्यांची जबाबदारी नेटाने पार पाडणारे पालिका प्रशासन, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका, मेडिकल कर्मचारी, सफाई कामगार दानशूर मंडळी व अनेक अदृश्य हात यांचाही यात मोठा वाटा आहे या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत मी माझा वाढदिवस कोविड योध्यांना समर्पित करीत आहे
माझे सगेसोयरे, नातेवाईक, मित्रपरिवार आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे सर्व कार्यकर्ते व माझ्या मोरे वस्ती, चिखली परिसरातील नागरिक बंधू-भगिनींनो माझ्या वाढदिवशी प्रत्यक्ष भेटण्या ऐवजी गरजू व्यक्तीला मदत करा हीच मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा असेल आपल्या शुभेच्छा मला फोन अथवा सोशल मीडियाद्वारे पाठवाव्यात ही विनंती
अशी कोविड योध्यांन बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत युवानेते पांडा भाऊ साने यांनी आपला वाढदिवस त्यांना समर्पित केला आहे तसेच या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र मंडळी तसेच नातेवाईक, कार्यकर्ते यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटण्या ऐवजी गरजू व्यक्तीला मदत करावी असे त्यांनी या आपल्या वाढदिवसानिमित्त आवाहन केले आहे.
Discussion about this post