व्हीएसआरएस न्युज पिंपरी- निगडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित आयुर्वेद रुग्णालय अँड स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील व संबंधित 125 डॉक्टरांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्याला पिंपरी चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. रागिणी पाटील, डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. विकास मंडलेचा, ‘राउंड टेबल इंडिया एरिया-15’चे चेअरमन कीर्ती रुईया, ‘पुणे अर्बन राउंड टेबल चॅप्टर 289’चे चेअरमन अंशुल मंगल, अक्षत रुईया आदी उपस्थित होते.
कोरोना काळात काही डॉक्टर आणि पोलीस यांनाही आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. मात्र, डॉक्टर आणि पोलीस समाजाचे रक्षक बनून अहोरात्र सेवा बजावत आहेत, असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांनी बजावलेले कर्तव्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. वर्षा डांगे, डॉ. रागिणी पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. राकेश नेवे, नवीन गोयल यांनी सूत्रसंचालन केले.
Discussion about this post