व्हीएसआरएस न्युज दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे.
या रिक्त झालेल्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
Discussion about this post