व्हीएसआरएस न्युज पिंपरी २८ ऑगस्ट २०१८ रोजी एकूण २५ नागरी सुविधा केंद्र चालकांना ३ वर्ष कालावधीसाठी करारनामा करुन नियुक्ती आदेश बजावला होता. त्याची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली.
महापालिकेच्या तसेच इतर शासकीय, निमशासकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी तिस-या टप्प्यात एकूण २५ ठिकाणी खासगी तत्वावर नागरी केंद्र सुरु ठेवण्यात आली आहेत. २५ जुलै २०१८ रोजी हे केंद्र सुरु करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला होता.
यातील ३ केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्रासाठी नेमणुका रद्द केल्या आहेत. तर, २२ केंद्रांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. दिघी, भोसरी, निगडी, चिंचवड, आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, पिंपरीगाव, वाकड, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव आदी परिसरातील हे केंद्र आहेत.
Discussion about this post