व्हीएसआरएस न्युज निगडी-कोरोना संक्रमणामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी सोहळा यंदाही बसमधून होणार आहे.
ती बस निगडी येथे १५ मिनिटे दर्शनासाठी थांबवावी, अशी मागणी शहरातील भक्तांकडून केली जात आहे.
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी बसमधून केली जाणार आहे. त्यासाठी मर्यादित संख्या निशचित करण्यात आली आहे. देहू गावातून निघणारी जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत निगडी येथे प्रवेश करते. तेथे शहरवासीयांच्या वतीने पालखीचे मोठे स्वागत केले जाते. पालखी वारीशी शहरातील लाखो भाविकांचे भावनिक नाते आहे.
नागरिकांच्या भावना लक्षात घेता निगडी येथे १५ मिनिटांसाठी बस दर्शनासाठी थांबवावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. अन्यथा रास्ता रोका आंदोलनचा इशारा त्यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोविड १९ चा सरासरी पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड ऑक्यूपन्सी विचारात घेता पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील निर्बंध सोमवारपासून (दि. २१) काही अंशी शिथील करण्यात येत आहेत. शनिवार आणि रविवार वगळता आस्थापना तथा उपक्रम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी आज याबाबतचा आदेश जारी केला आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
तसेच कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरिता प्रसारणाची साखळी प्रभावीपणे खंडित करण्यासाठी लावलेले निर्बंध जिल्हानिहाय / प्रशासकीय युनिट निहाय शिथिल करणे तसेच विविध आर्थिक आणि सामाजिक उपक्रम नियोजनबद्ध सुरु करण्याच्या अनुषंगाने शासनाने सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत.
Discussion about this post