व्हीएसआरएस न्युज मुंबई शहरातील बीकेसीमधल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. उड्डाणपुलाचं काम चालू असताना ही दुर्घटना पहाटे घडली. या दुर्घटनेत 13 मजूर जखमी झालेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस पोहोचले आहेत.
मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स भागात काम चालू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. य़ा दुर्घटनेत तेरा मजूर जखमी झाल्याने या मजुरांना जवळच्या बीएन देसाई रुग्णालायात उपचारासाठी हलविण्यात आले. पहाटे साडेचार वाजता ही दुर्घटना घडली. ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे. दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी 22 मजूर उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Discussion about this post