व्हीएसआरएस न्युज पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने (एनएमसी) गुरुवारी मान्यता दिली.
त्यामुळे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असलेली पुणे ही राज्यातील तिसरी महापालिका ठरली आहे. येत्या शैक्षणीक वर्षापासून येथे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवतील.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पापासून सिद्धीपर्यंतचा प्रवास या अंतिम मंजुरीने पूर्ण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. अंतिम मंजुरी मिळेपर्यंतच्या सर्व टप्प्यात स्वतः लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करून घेतली.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र न्यास स्थापन केला आहे. त्यात महापालिकेचे पदाधिकारी विश्वस्त आहेत. या महाविद्यालयासाठी दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Discussion about this post