व्हीएसआरएस न्युज कर्नाटकातील उटीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे.त्यांचा तपास सुरू आहे.
सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत.
Discussion about this post