व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांमधून तसेच वाहनधारकांमधून देखील एक संतापाची लाट पसरली जात आहे.
पिंपरी – दि १४ सप्टेंबर (मंगळवार) आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आजघडीला माेठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. या खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची दाट शक्यता आहे.
उद्याेगनगरी असल्यामुळे दररोज रस्त्याने हजारो वाहनांची ये-जा सुरु असते, अनेक लहान माेठ्या वाहनाने लाेक कामावर जात असतात. अनेक ठिकाणी रस्त्याला माेठे खड्डे पडले आहेत त्याचा त्रास लाेकांना सहन करावा लागत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आकुर्डी, निगडी, साने चाैक, चिखलीरोड, प्राधिकरण, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन परिसरात माेठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डडे पडले आहेत. माेठ्या प्रमाणात कर देवुन सुध्दा चांगली सुविधा मिळत नसल्याने शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर संबधित विभागाने शहरातील खड्डे बुजवावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून तसेच समाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या कडुन करण्यात येत आहे.
Discussion about this post