व्हीएसआरएस न्युज शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा मोठा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र, भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपवर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. “योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात महिला अधिकाधिक असुरक्षित झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे योगी सरकार ब्राह्मणांना योग्य न्याय देत नाही. भाजपच्या राजवटीत यूपीमधील आरोग्य सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याचा आरोपही शिवसेनेने केला. लोक बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहेत,” असे उत्तर प्रदेशचे शिवसेना पक्षप्रमुख अनिल सिंह यांनी म्हटले आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे (Uttar Pradesh Assembly Elections 2022) सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post