व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिका प्रशासनाने काम पूर्ण झाल्याचे पत्र महापौरांना दिले आहे. विरोधाकांसह नागरिकांनी मागणी करूनही पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी केली होती.
तर, भाजप त्यांच्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची भूमिका घेतली आहे. पुलाचे उद्घाटन केले जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज पूल वाहतुकीसाठी खुला केला.
तीन वर्षे या उड्डाण पुलाच्या कामामुळे दीड-दोन किलोमीटरचा वळसा मारायचा त्रास जनतेने गपगुमान सहन केला. आता मार्ग पूर्ण होऊनही केवेळ उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे यासाठी अत्यंत महत्वाचा लोकांच्या सोयिचा मार्ग बंद असल्याने लोक संतापले असल्याचे नागरिकांच्या सोईसाठी आम्ही पुलाचे उद्घाटन केले.
Discussion about this post