व्हीएसआरएस मराठी न्युज -13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली. केंद्राने जाहीर केलेल्या यादीनुसार गुलाबचंद कटारिया यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी रविवारी 13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा केली. राष्ट्रपतींनी जारी केलेल्या यादीनुसार गुलाबचंद कटारिया यांची आसामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राजेंद्र विश्वनाथ यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य यांना सिक्कीमचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. सीपी राधाकृष्ण यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवप्रताप शुक्ला यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती (निवृत्त) एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post