व्हीएसआरएस मराठी न्युज –नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बस मध्ये एकूण 29 प्रवासी होते, त्यातील सात प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावात हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर रात्री एक ते दीडच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्स ला अपघात झाला. ही बस एका खांबाला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली. बस डाव्या बाजूला पलटी झाल्यानं दार बंद झालं आणि बाहेर पडण अशक्य झालं. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार २५जणांचा मृत्यू झालाआणि बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर हा अपघात झाला.
Discussion about this post