व्हीएसआरएस न्युज जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी होण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सरकारने हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्करसाठी लशीचा प्रिकॉशन डोस देण्यात येईल. याची सुरुवात 10 जानेवारीपासून होईल.
“भारताने आतापर्यंत 141 कोटी लशीचे डोस दिलेत. घाबरून जाऊ नका, मास्क परिधान करा, नियम पाळा”, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
“लसीकरण हे कोरोना लढाईतलं मोठं अस्त्र आहे. 18 लाख आयसोलेशन बेड्स आहेत. 5 लाख ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स आहेत. आयसीयू आणि नॉन आयसीयू मिळून लहान मुलांसाठीही स्वतंत्र बेड्स आहेत”, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
“देशात 3000 हून अधिक ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
नव्या वर्षात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात घोषणा केली.
मोदींनी केलेल्या तीन मोठ्या घोषणा
- १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आता लसीकरण सुरु होणार आहे. सोमवार, ३ जानेवारी २०२२ पासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल.
- वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्ससाठी Precaution Dose अर्थात बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सोमवार, १० जानेवारी २०२२ पासून या सुविधेला सुरुवात होईल.
- ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, लसीचा Precaution Dose (बूस्टर डोस) घेता येईल. येत्या १० जानेवारीपासून ही सुविधाही सुरु होईल.
Discussion about this post