शिरगाव | (व्हीएसआरएस न्यूज) | मावळ तालुक्यातील शिरगाव येथून ४ मोबाईल तसेच ७०० रुपये रोख रक्कम असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. ९) रात्री साडेअकरा ते शुक्रवारी (दि. १०) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी धर्मेंद्र दत्तन सिंह (वय ४९, धंदा-मजुरी, रा. भवरलाल चौधरी चाळ, शिरगाव, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या भाड्याच्या खोलीच्या उघड्या दरवाज्यातून अज्ञात चोरट्यांनी प्रवेष केला. घरातील फिर्यादी व इतर सहकाऱ्यांचे ४ मोबाईल व ७०० रुपये रोख रक्कम असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. पुढील तपास पोलीस नाईक परदेशी हे करत आहेत.
Discussion about this post