व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेला चांगले यश आले आहे. आगामी काळातही अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
मोहिमेत चांगले काम करणाऱ्या पहिल्या तिघांना पोलिस आयुक्तांनी शाबासकी दिली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये कोयता किंवा तत्सम हत्यार पकडणाऱ्या पोलिसांना एक आणि पिस्तूल पकडणाऱ्या पोलिसांना दहा गुण अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १९ जानेवारीला सुरू करण्यात आलेली ही मोहीम सलग पंधरा दिवस सुरू होती.
दरोडाविरोधी पथकाने १५० गुण मिळवून स्पर्धेत विजेत्याचा किताब पटकावला. १०७ गुण प्राप्त करून गुंडाविरोधी पथक उपविजेता ठरले. ‘युनिट चार’चे पथक तिसऱ्या क्रमांकावर राहिले. पोलिस ठाण्यांमध्ये महाळुंगे, शिरगाव, पिंपरी अनुक्रमे आघाडीवर होते. त्यांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मोहिमेत पंधरा दिवसांत ४८ पिस्तुले आणि २०५ धारदार शस्त्रे अशी एकूण २५३ शस्त्रे जप्त केवी गेली. मागील वर्षभरात ४३ पिस्तुले जप्त झाली होती.
पोलिस ठाण्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणेः
महाळुंगे ४५ (प्रथम क्रमांक),
शिरगाव ३८ (द्वितीय क्रमांक),
पिंपरी ३७ (तृतीय क्रमांक),
हिंजवडी २४, चाकण २१, चिंचवड १६, आळंदी १२, रावेत ११, चिखली १०, सांगवी ६, भोसरी ६, वाकड ५, भोसरी एमआयडीसी ५, निगडी ५,
तळेगाव एमआयडीसी ४, दिघी ३, तळेगाव दाभाडे ३, देहूरोड १.
दरोडाविरोधी पथक १५० (प्रथम क्रमांक),
गुंडाविरोधी पथक १०७ (द्वितीय क्रमांक),
युनिट चार ६७ (तृतीय क्रमांक),
युनिट दोन २१, युनिट पाच २०,
युनिट तीन १७, युनिट एक ७,
खंडणीविरोधी पथक ६.
Discussion about this post