व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
तळवडे (Talawade) आग दुर्घटनेतील मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) संगीता देवेंद्र आबदार (वय 28)
2) पूनम अभय मिश्रा (वय 36)
3) लता भारत दंगेकर (वय 40)
4) मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45)
5) राधा सयाजी गोधडे (वय 18)
6) कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65)
आगीत होरपळल्यामुळे मृतदेहांची अवस्था फार वाईट झाली होती. दुर्घटनेतील जखमी देखील बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यास विलंब लागला.
या दुर्घटनेत एकूण 10 जण जखमी झाले असून त्यांच्या पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. शिल्पा राठोड (वय-31), प्रतीक्षा तोरणे (वय 16), अपेक्षा तोरणे (वय 26), कविता राठोड (वय 45), रेणुका ताथोड, (वय- 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), सुमन (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (32).
अजित पवार यांनी म्हटले की, “पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनविण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं, “पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे ‘फायर कँडल’ तयार करणार्या एका कारखान्याला आग लागून 6 महिलांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
Discussion about this post