पिंपरीः पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात काल दि. ८ डिसेंबर रोजी कारखान्याला लागलेल्या आगीत ६ कामगार महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृत महिलांची ओळख पटली असून
संगीता देवेंद्र आबदार (वय 28)
पूनम अभय मिश्रा (वय 36)
लता भारत दंगेकर (वय 40)
मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45)
राधा सयाजी गोधडे (वय 18)
कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65)
अशी त्यांची नावे आहेत.तर,
शिल्पा राठोड (वय-31)
प्रतीक्षा तोरणे (वय 16)
अपेक्षा तोरणे (वय 26)
कविता राठोड (वय 45)
रेणुका राठोड (वय 20)
शरद सुतार (वय 45)
कोमल चौरे (वय 25)
सुमन (वय 40)
उषा पाडवे (वय 40)
प्रियंका यादव (32)
या जखमी झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आणि मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल असे म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या प्रकरणी स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. गव्हाणे यांनी काल घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गव्हाणे यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मृतांच्या नातेवाईंकांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देण्यात यावा अशीही मागणी गव्हाणे यांनी केली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Discussion about this post