व्हीएसआरएस मराठी न्युज -सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यातील 58 जागांसाठी 623 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात शामली, हापूड, गौतम बुद्ध नगर, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, बुलंदशहर, अलीगड, मथुरा तसेच आग्रा जिल्ह्यात मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी प्रचार तोफा थंडावल्या होत्या. या टप्प्यात 2.27 कोटी मतदार मताधिकार बजावणार आहे. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार इतर जिल्ह्याकडे वळवला आहे.
Discussion about this post