व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यात सीएनजी गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुण्यात 1 ऑक्टोबर रोजी शहरातील CNG पंप बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे शहरात 60 पेक्षा जास्त सीएनजी पंप आहेत.
पुणे शहरातील CNG पंप 1 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत. पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने रिक्षा चालतात. दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील टॉरेंट गॅस पंपांवर 1 ऑक्टोबरला CNG ची विक्री होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर चालणारी आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत.
पंप बंद ठेवण्यात येणार असल्याने पुण्यातील सार्वजनिक वाहतूकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post