व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यभरामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये पक्षाध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे महत्त्व आहे. योगदान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. पक्षाच्या प्रतिकूल काळामध्ये आझमभाई यांनी राष्ट्रवादीची खिंड लढवली. पिंपरी -चिंचवडमध्ये पानसरेंचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे. पानसरे यांनी विधानसभा, मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, गावकी-भावकीच्या राजकारणाचा त्यांना नेहमीच फटका बसला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. बंद दाराआड चर्चा झाली. आझमभाईंची साहेबांशी भेट यामुळे शहरातील अजित पवार गटाने धसका घेतला आहे.
Discussion about this post