व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरा केली. ईदगाह मैदान, मस्जिद, मदरसामध्ये नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
विविध भागात स्थानिक राजकीय सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची भेट घेवून ईद निमित्त पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.
रमजान महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलेही व सल्लम याचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधवांनी रोजा (उपवास) महिनाभर केला, या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुरआन पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली.
सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद व मदरसाकडे वळाली, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना धर्मगुरूंनी नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post