व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाजाला स्त्री-पुरुष समानतेबरोबरच एकात्मता, बंधुता, अहिंसा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला, त्यांच्या व्यापक विचारसरणीचा वारसा आजही जोपासला जात आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
यावेळी जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे, अनिल बोचरे, अंदप्पा सक्करगी, ओंकार चिमेगामे, सतीश सोनटक्के, राकेश आवटे आदित्य खोचरे आदी विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post