व्हीएसआरएस मराठी न्युज –मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावर मानहानीच्या खटल्यात दोषी ठरलेल्या राहुल गांधींना सुरत उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीश रॉबिन मोघेरा यांनी गुरुवारी २० एप्रिल रोजी हा निकाल दिला.
त्यानुसार त्यांनी राहुल गांधींना २ वर्षांच्या शिक्षेत कोणताही दिलासा दिलेला नाही. आता राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.
भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षांनंतर २३ मार्च रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या विरोधात राहुल गांधी यांनी दाखल याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता काँग्रेस उच्च न्यायालयात जाणार आहे.
Discussion about this post