व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-परवानगी न घेता स्मार्ट शौचालयाची उभारणी आयुक्त सिंह कडे तक्रार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाची परवानगी न घेता पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्यावतीने निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस स्थानक येथे स्मार्ट शौचालय बांधण्यात येत आहे. ते बांधकाम नियमबाह्य असल्याची तक्रार करण्यात आली आहे. स्मार्ट शौचालय बांधण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने १५ वर्षांचा करार केला आहे. तेथे शौचालय व दुकानासाठी गाळा बांधण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतगत शौचालय व दुकान गाळा जागा १५ वर्ष करारनामा करून देण्यात आली विनामूल्य कोणत्याही प्रकारची रक्कम किंवा भाडे आकारणी करण्यात आली नाही? सदर जागा रेड झोन एरिया मध्ये येत असून तरीसुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व स्मार्ट सिटी अधिकारी जाणूनबुजून पाठबळ देत आहे?
त्यासाठी महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभाग, बांधकाम परवानगी आणि फ क्षेत्रीय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची बैठक विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २६) चिंचवड येथील स्मार्ट सिटी कार्यालयात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, केंद्र सरकारच्या नामनिर्देशक संचालक ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सचिव चित्रा पवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे ऑनलाइन होते.
Discussion about this post